मनोज वर्ल्ड फाऊंडेशन संचालित
स्वराज्य स्वयंसेवक समिती

एक दिवस मानवते साठी
पर्यावरणाच्या रक्षणासाठी
चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन पर्यावरणाचे संवर्धन करु

समाजासाठी कार्य करणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी प्रामाणीकपणे निभावणे आवश्यक आहे. सामाजिक विकासासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे आपण कधीही विसरून चालणार नाही. आपल्या प्रगतीसाठी, आपल्या विकासासाठी आपण समकालिन होण्यास सक्षम, आणि तत्पर असायला हेवे. ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. आपण समूहाच्या गरजांकडे तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. समाजातील लोकांनी मला काय दिले आहे हे सांगणे सोपे आहे, पण मी समाजाला काय दिले! हे सांगता आले पाहीजे. म्हणूनच आपण सामाजिक विकासाठी असे अनेक उपक्रम करू शकतो. जे तुम्हाला पुढे पाहता येतील. की ज्या उपक्रमांद्वारे समाजाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. परिणामी त्यातून आपोआपच समाजा बरोबरच तुमचाही सर्वांगीण विकास होईल.

अधिक माहितीसाठी

“ आपण जे मिळवतो त्यानुसार आपण जीवन जगतो,

परंतु आपण जे काही देतो त्यानुसार आपण दुसऱ्याचे जीवन घडवतो.”

स्वराज्य स्वयंसेवक समितीच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा मानस आहे.

सेवा

                महाराष्ट्रात दुष्काळजन्य परीस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी शासनाकडून लातूर सारख्या ठिकाणी रेल्वेने पाणी पुरविण्यात आले होते. तेव्हा मनोज फौंडेशनमधील स्वराज्य स्वयंसेवक समितीही माघे राहीली नाही. स्वराज्य स्वयंसेवक समितीनेही महाराष्ट्रातील लातूर येथील गंगापूर या ठिकाणी दुष्काळ असताना त्या गावातील लोकांना मदत म्हणून अन्नदान करण्याचे महत्वपुर्ण काम केले आहे. तसेच इंदूमती अनाथ आश्रमाला तब्बल दहा क्विटलचे अन्न दान करण्यात आले. तसेच काही अत्महत्या गृस्थ शेतकर्यांच्या बारा मुलांना आणि त्यांच्या कुटूंबियांना अन्न दान करण्यात आले. त्याच्या शाळेची आणि वसतिगृहाची फि भरण्यात आली. अशा प्रकारची अनेक समाजोपयोगी कामे स्वराज्य स्वयंसेवक समितीच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आणि परदेशातही करण्याचे महान कार्य केले जाते. तेव्हा आपल्या सारख्या सामाजिक कार्याची आवड असणार्या लोकांच्या सहयोगाची आवश्याकता आहे. तेव्हा आपण ही आपल्या इच्छेनुसार या सामाजिक कार्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण फक्त आपला वेळ आणि श्रमदान करण्याची आवश्यकता आहे. स्वराज्य स्वयंसेवक समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक युवकांना एकत्रित करण्याचे महत्वापुर्ण काम केले गेले आहे. तसेच करिअर मार्गदर्शन, रोजगार मेळावे, असंख्य मुलींना शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले गेले आहेत. त्याचप्रमाणे यशस्वी गुणवंत आणि हुशार, गरजू विद्यार्थ्याना शिष्यवृत्त्या तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सत्कार करून गुणगौरव करण्यात आला आहे. अशी अनेक कामे स्वराज्य स्वयंसेवक समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे

सामाजिक

शैक्षणिक

सांस्कृतिक

कृषी

आरोग्य

औद्योगिक

स्वराज्य स्वयंसेवक समितीच्यामाध्येमातून समाजातील वेगवेगळ्या समस्यावर चर्चा करून आपल्या वैयक्तीक जबाबदारीने त्या कशा सोडवता येतील त्या दृष्टीने प्रयत्न करणे, तसेच सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे. फुटपाथवर राहणार्या लोकांसाठी त्यांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक, राहण्याच्या सोयीसुविधांसाठी प्रयत्न करणे.

शाळेमधील मुलांना मुल्याशिक्षण, शाळेची गोडी लागावी म्हणून वेगवेगळे खेळ, पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे कार्यक्रम उदा. झाडे लावणे, स्वच्छता मोहिम राबविणे तसेच मुलांच्या व्यक्तीमहत्व विकासा होण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्यानांचे आयोजन करणे. विज्ञानाची गोडी वाढावी या दृष्टीने शाळेत विज्ञान प्रदर्शनासारखे वेगवेगळे प्रयोग सादर करणे,

पथनाट्याद्वारे लोकांच्यामध्ये शिक्षण, बेटी बचावो, स्वच्छता गृहाचा वापर, मतदानाचा हक्क, रहदारीचे नियम अशा अनेक विषयांवर पथ नाट्याच्या माध्यमातून स्वयंसेवक समितीद्वारे लोकांमध्ये जन जागृती करण्याचे महत्वपुर्ण काम केले जाते.

ग्रामीण भागात जावून लोकांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्याचे काम स्वराज्य स्वयंसेवक समितीच्या माध्यमातून केले जाते. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दुष्काळाने पिचला गेला आहे. कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे त्या शेतकर्याना योग्य ती मद्त करण्याचे काम या समितीच्या माध्यमातून केले जाते, शेतकर्यांना शेतितील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाविषयी माहीती देवून जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीकोणातून मार्गदर्शन करण्यात येते. ग्रामीण भागातील काही शेतकर्याना मोबाईल कसा वापरावा हे माहित नाही किंवा एखादी शेतकर्यासाठी शासकीय योजना असेल तर, त्या योजनेचे फाॅर्म हे सध्या वाॅनलाईन भरावे लागतात. जार ते व्यवस्थित भरता आले नाही तर, त्या लाभार्थ्याला त्या योजनेचा लाभ मिळत नाही. आत्ताचा शेतकरी कर्जमाफी देण्यात आली. अनेक शेतकऱ्याना त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्याना फाॅर्म कसा भरला जावा याचे प्रशिक्षण दिले जाते.

समाजात आरोग्य विषयक समस्या खुप आहेत. त्यासाठी त्या समस्यांचे मुळ कोठे आहे हे शोधणे आणि त्यावरील उपाय
उदा. कॅलरा, डारिया, जुलाब या सारखे आजार खराब पाण्यामुळे होतात. त्यासाठी पाण्याचेे स्रोत स्वच्छ करून त्याच्या आजूबाजूला अस्वच्छता होणार नाही याची काळजी घेण्यासाठीचे मार्गदर्शन करणे, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे, रक्तदान शिबीरांचे आयोजन करणे, गरजू रुग्णांना शासकीय सोयीसुविधा बद्दल माहिती देणे, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था आहेत ज्या लोकांना मोठ्या आॅपरेशनसाठी मदत करतात त्यांची माहीती देणे. महिलांचे आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करणे, स्वच्छता मोहिम राबविणे, सायकल रॅली काढून तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलींगचे महत्व पटवून देणे, योगासने करण्यासाठी लोकांना प्रोत्साहीत करणे आणि योगासणांचे महत्व सागंणे आशा वेगवेगळ्या आरोग्यशी निगडीत

अनेक मुल- मुली मोठ मोठ्या डिग्र्या घेऊनही त्यांना नोकर्या मिळत नाहीत त्यासाठी वेगवेळ्या कंपन्यांमध्ये जावून या मुलांनसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करणे, कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःला उद्योग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शन करणे.

जर एक चांगले आणि सुरक्षित जग निर्माण करण्याच्या आशेने इच्छाशक्ती असेल,

तर आम्हाला आधीपेक्षा अधिक स्वयंसेवकांच्या प्रतिबद्धतेची आवश्यकता असेल.

आमचे स्वयंसेवक काय म्हणतात...

प्रायोजक


संपर्क साधा

आपण हे सर्व करण्यास स्वत: रहावे अशी तुमची इच्छा आहे. आपण "स्वयंसेवक" होऊ शकता.
आम्ही नवीनतम कार्ये विचार करण्यासाठी आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू शकता.